महिला घरात कपडे बदलत होती; तरूणाने घरात प्रवेश करून…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :-   महिला मजुरी काम करून घरी आली. घरात कपडे बदलत असताना तरूण तिच्या घरात घुसला. त्याने कपडे बदलतानाचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तरूणाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षद मनोज चावला (रा. सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या पतीचे सुमारे 20 वर्षापुर्वी निधन झाले आहे.

मोलमजुरी करून ती उदरनिर्वाह करते. फिर्यादी शनिवारी सायंकाळी मजुरीच्या कामावरून घरी आल्यावर घरात कपडे बदलत असताना चावला तिच्या घरात घुसला.

त्याच्याकडील मोबाईलमध्ये फोटो काढायचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केला असता रोडवरील मुले पळत आली व त्यांनी चावलाला धरले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निपसे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe