अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Crime :-अलिकडच्या काळात ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. अनेक मार्गाने फसवणूक केली जात आहे. अशीच फसवणूक मच्छिंद्र शेरकर (रा. अहमदनगर) यांची झाली होती.
मात्र त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क केल्याने शेरकर (रा. अहमदनगर) यांचे गेलेले 49 हजार 700 रूपये परत मिळाले आहे. ऐनीडेक्स अॅप डाऊनलोड केल्याने शेरकर यांच्या खात्यातून 49 हजार 700 रूपये काढून घेतले.
त्यांनी आर्धा तासात सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अभिजित अरकल,
राहुल गुंड्डू, उमेश खेडकर, सविता खताळ यांनी तांत्रिक तपास करून शेरकर यांची फसवणूक झालेली रक्कम त्यांना परत मिळून दिली. नागरिकांनी ऑनलाईन फसवणूकीपासून सावध राहावे,
फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास फसवणूकीची रक्कम मिळण्यास मदत होते. यामुळे फसवणूकीपासून सावध राहण्याबरोबर तक्रार तात्काळ दाखल करावी, असे आव्हान पोलिसांनी केले आहे.