अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, त्याच पद्धतीने प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे पुरुष असतो. त्यामुळे महिलांच्या यशात पुरुषांना दुय्यम समजून चालणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे यांनी केले.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेटच्यावतीने प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रेणुकामाता मल्टीस्टेटच्या सौ. जयंती भालेराव या होत्या.

यावेळी तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख, परिवहन अधिकारी वाघ, क्षेत्रे, वांडेकर, ॲड. राधिका नावंदर, श्रीमती मंगल भालेराव, मुख्याध्यापिका प्रतिभा धरम,
श्रीमती शोभना जोशी, कुस्तीपटू अंजली देवकर, सौ. विजया शेळके, सौ. प्रियंका शेंडगे, सौ. संध्या मेढे, ॲड. नितीन भालेराव, सीईओ हरिचंद्र मोरे आदी उपस्थित होते.
न्या. देशपांडे म्हणाल्या की, महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव होऊन वाटचाल केली तर महिलांना समाजात दुय्यम स्थान राहणार नाही. महिलांनी त्यांच्या हक्कासाठी पुढे आले पाहिजे.
श्री रेणुकामाता मल्टीस्टेटने सामाजिक व प्रशासकीय सेवेतील महिलांचा गौरव करून समाजात एक वेगळा संदेश दिला आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्यास मोठा हातभार लागेल.
ॲड. राधिका नावंदर म्हणाल्या की, महिलांनी स्वतःला कधी कमी न लेखता प्रत्येक क्षेत्रात काम करत राहावे. त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे संख्या वाढत आहे, ही स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
महिलांना त्यांचे हक्क व अधिकार आता समजू लागले आहेत. त्यातून महिला सक्षमीकरणाचे प्रमाण वाढले आहे. यावेळी परिवहन अधिकारी वाघ, अंजली देवकर, सौ. प्रतिभा धरम यांची भाषणे झाली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक सौ. अमिता चन्ना, सूत्रसंचालन वैष्णवी रासकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मोनिका गाडेकर यांनी मानले.