“सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशचे सगळ्यात मोठे उदाहरण अनिल देशमुख, ९० छापे मारण्याचा पहिला प्रकार” : शरद पवार

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडी (ED) आणि आयकर विभागाची (Income Tax) पथके लागलेली दिसत आहेत. यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी प्रतिकिया दिली आहे.

शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत भाजपवर (BJP) हल्ला चढवला आहे. तसेच भाजप सत्तेचा गैरवापर देखील करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख (anil deshmukh) यांचे आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर तब्बल ९० छापे टाकण्याचा प्रकार मी तरी पहिल्यांदाच पाहिला आहे.

एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने छापे टाकायचे, याचा अर्थ केंद्राच्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट होत आहे आणि सदर प्रकार हा संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अशोभनीय आहे अशी नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्या यंत्रणेने अनिल देशमुखांच्या घरी किती छापे मारले आणि कुणा कुणावर छापे मारले याची यादीच शरद पवार यांनी वाचून दाखवली आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल विधानसभेत काही आरोप केले. त्याचे पुरावेही त्यांनी सादर केले. एका पेन ड्राईव्हत काही व्हिडीओ पुरावे आहेत, ते त्यांनी दिले.

या व्हिडीओत संबंधित व्यक्तीने माझाही उल्लेख केला आहे. पण व्यक्तिश: या गोष्टीत माझा कुठलाही संबंध नाही. कुणी तरी तक्रार करायची आणि त्या तक्रारीतून लोकप्रतिनधींवर वेगवेगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांना नामशेष केलं जात आहे.

बंगाल आणि महाराष्ट्रात त्याची संख्या अधिक आहे ही आमची तक्रार आहे असेही शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. देशमुख यांचे कुटुंब, नातेवाईक, चार्टड अकाऊंट, सहकारी कर्मचारी, प्रायव्हेट सेक्रेटरी अशा ९५ लोकांवर रेड झाल्या.

२०० लोकांना बोलावून चौकशी केली. ईडीने ५०, सीबीआयने 20 आणि इन्कम टॅक्सने २० छापे मारले. असे ९० छापे एका व्यक्तीच्या घरी मारण्यात आले. ९० मारण्याचा प्रकार मी पाहिल्यांदाच पाहिला आहे.

असं मी यापूर्वी कधी ऐकलं नव्हतं. एवढे छापे पाडून काही हाती लागत नाही म्हणून त्यांना त्रास दिला जात आहे असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe