दोघी बहिणी माहेरी आल्या की तो युवक करायचा असे कृत्य; अखेर…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- दोघा बहिणींची छेड काढून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी रोहन बाबासाहेब कराड (वय अंदाजे 23, रा. शनिमंदिराजवळ, शास्त्रीनगर, केडगाव) याच्याविरूध्द कोतवाली पोलीसी ठाण्यात गुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावामध्ये सासर व अहमदनगर शहरातील एका उपनगरात माहेर असलेल्या पीडित महिलेले फिर्याद दिली आहे.

पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, मी व माझी बहिण आमचे लग्न झाले आहे. आम्ही माहेरी आल्यानंतर रोहन कराड हा आमच्याकडे पाहून इशारे करणे, शिट्टी वाजविणे, आमचा पाठलाग करणे, असे वर्तन करत असतो.

रविवार, 6 मार्च 2022 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मी आणि बहिण अंगणात उभ्या असताना रोहनने आमच्याकडे पाहून खडा फेकला, आम्ही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याने गैरकृत्य करत विनयभंग केला असल्याचे पीडित महिलेले दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

कोतवाली पोलिसांनी विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe