मुंबई : भाजपाचे (Bjp) नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर कडाडून हल्लाबोल केला आहे. यावेळी ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे सांगून त्यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी मुनगंटीवार म्हणाले, ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. १९९३ बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, कोणी पाय गमावला आहे.

तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता प्रिय आहे. ही फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे पण आम्ही आता फ्लावर नाही फायर होणार असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला चांगलेच सुनावले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले, राजीनामा तुमच्या बापाला द्यावा लागेल. भाजपने तुमची दाणादाण केली आहे. या नेत्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवायचं आहे, कारण सत्तेत आल्यापासून त्यांनी लोकांचं वाटोळ केलं आहे असंही मुंनगटीवार म्हणाले.
यावेळी मुनगंटीवार यांनी बोलताना शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली आहे. आज मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून भाजपाची लोक आली होती.
तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा आम्ही नक्की घेणार असल्याचा विश्वास देखील यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.