Assembly Election Results 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागत आहे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू कोणत्या राज्यात कणांचे सरकार सत्ता स्थापन करणार हेही स्पष्ट होताना दिसत आहे.
उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) मध्ये सर्वाधिक जागांवर आघाडीवर असलेला पक्ष हा भाजप (BJP) ठरला आहे. भाजपने २७२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दोन नंबरला सपा हा अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचा पक्ष आहे. त्यांनी १२१ जागांवर आघाडी घेतली आहे.

मायावती (Mayavati) यांच्या पक्षाला फक्त ५ जागांवर आघाडी घेता आली आहे. त्यामुळे भाजपने बसपाचा हत्ती सपाट केल्याचे दिसत आहे. गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांनी ४० हजारांहून अधिक आघाडी घेतली आहे.
पाच राज्याच्या निवडणुकीमध्ये ४ राज्यात भाजपला यश आल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा एकदा योगींचें (Yogi Adityanath) सरकार येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सपाला मोठा झटका बसला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला २७२ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला १२१ जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 13 जागांवर बीएसपी (BSP) 4 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर.
जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 4 जागा, राष्ट्रीय लोक दल 10 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागांवर आघाडीवर आहे.
उत्तरप्रदेशमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सपाच्या कार्यकर्त्यांना अजूनही निवडून येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास आहे.