“जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त”, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या जखमेवर मीठ

Published on -

जालना : आज पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भाजप (BJP) मुसंडी मारताना दिसत आहे. मात्र शिवसेनेला (Shiv sena) कुठं यश येताना दिसत नाही. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. तसेच गोव्यातही भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचा सगळीकडे सुपडासाफ झाल्याचे दिसत आहे.

रावसाहेब दानवे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Election) आणि गोव्यातही पक्ष विस्ताराचे धोरण ठेवत शिवसेनेने नशीब आजमावले.

याआधीही शिवसेनेने असे प्रयोग केले आहेत. मात्र त्यात फारसे यश आले नव्हते. यंदाच्या निवडणुकीतही शिवसेनेला मोठं अपयश आल्याचं चित्र आहे.

गोवा (GOA) आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला हार पत्करावी लागणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते अशी टीका दानवेंनी शिवसेनेवर केली आहे.

शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचं स्वरप्न कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळे हा पक्ष जिथे जाईल तेथे उमेदवारांचं डिपॉझिट जप्ट होईल. असा विश्वासही दानवेंनी व्यक्त केला आहे.

देशातील निवडणुकांमध्ये भाजपला जनतेनं झुकतं माप दिल्याचं चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसतील, अशी चर्चा सुरु आहे.

त्यामुळे २०२४ मध्ये राज्यातलं महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आम्ही पाडणार नाही तर जनताच हे सरकार पाडेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News