इंदुरीकर म्हणाले…. मी कीर्तनातून खरं बोलतो म्हणून माझ्या व्हिडीओ क्लिप्स बनवल्या जातात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत येत असतात. यापूर्वी त्यांचा करोना संबंधी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.

त्यांच्या अशाच काही वादग्रस्त विधानाच्या क्लिप सोशलवर मीडियावर चांगल्याच व्हायरल झाला होत्या. नुकतेच त्यांनी आपल्या एका वक्त्याववर स्पष्टीकरण दिले आहे.

जगात असंख्य समस्या प्रश्न आहेत. मात्र त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स बनवल्या जात नाहीत. मी कीर्तनातून खरं बोलतो म्हणून माझ्या दररोज व्हिडीओ क्लिप्स बनवल्या जातात.

त्या क्लिप्समध्ये माझ्या वाक्यांची मोडतोड करून वादग्रस्त विधान म्हणून लोकांसमोर आणल्या जातात. मी प्रत्येक वेळी चांगलं सांगतो तरी काहींच्या भावना का दुखावतात? असा सवाल निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केला.

कोल्हार भगवतीपूर येथे श्री भगवतीदेवी मंदिराच्या प्रांगणात आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. इंदोरीकर महाराज म्हणाले, भुंग्याला जशी मकरंदाची गोडी लागते, तशी आपल्याला भजनाची गोडी लागली पाहिजे. जीवनात पैसा पैसा कामी येत नाही. पैशाची घमेंड करू नका.

आपल्याला पुण्यकर्मच कामी येतात, माणसाचं मन मोठं आणि हृदय निर्मळ असावे. हृदय निर्मळ करण्यासाठी भगवंताचे भजन करावं. शरीर शुद्ध नसले तरी चालेल पण चित्त शुद्ध असले पाहिजे.

आपण एवढे सुशिक्षित आहोत मग आपल्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम का आहेत? शेतकऱ्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात नाहीत. ज्यांना लाखो रुपये पगार आहे, त्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात का दिसतात? ज्या महाराष्ट्रात संतांची परंपरा आहे.

छत्रपतींनी स्वराज्य स्थापना केली, तिथे वृद्धाश्रम कशाला हवेत ? अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News