चाकूने तुझे तुकडे करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :-  वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक तात्याराव सोमवते (रा.महालगाव) असे गुन्हा नोंदविलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी अभिषेक सोमवतेला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, महालगाव येथील पिडीत १४ वर्षीय मुलगी बाजारतळ परिसरातील आपल्या आजीकडे राहते.

पिडीत मुलगी मागील चार महिन्यांपूर्वी परिसरातील ओढ्याजवळील चिंचाच्या झाडाखाली सरपण वेचत होती. त्यावेळी घरासमोर राहत असलेला अभिषेक सोमवते हा त्या ठिकाणी आला.

त्याने पिडीतेला पकडून शेजारच्या उसाच्या शेतात वून गेला. चाकूने तुझे तुकडे करण्याची धमकी देत अभिषेकने तिच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने घरी कोणाला ही घटना सांगितली नाही.

त्यानंतरही लग्नच अमिश दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला यातून ती पिडीता गरोदर झाली. आजीसोबत दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी ती गर्भवती झाल्याची माहिती आजीला दिली.

त्यांनतर पिडीतेने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पिडीताच्या फिर्यादीवरून अभिषेक तात्याराव सोमवते (रा.महालगाव) याच्यावर वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News