सोयाबीन चोरी करणारी टोळी गजाआड; सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- अकोले पोलिसांनी शेतकऱ्यांची सोयाबीन चोरी करणाऱ्या सहा आरोपींना गजाआड केले असून त्यांच्याकडून ९ लाख २५ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

दरम्यान अकोले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतकऱ्यांची तयार केलेली सोयाबीन चोरी जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. याबाबत अकोले पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलिसांना दि. ६ मार्च रोजी गुप्त बातमीदारामार्फत सोयाबीन चोरी करुन तिची विक्री करण्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.

अकोले पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून चारजणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सोयाबीन चोरीची कबुली दिली.

याप्रकरणी अजय बाळू मेंगाळ रा.गर्दणी, लहू वाळीबा मेंगाळ रा. तांभोळ, विजय अशोक खोडके व भिमराज गंगाराम मेंगाळ दोघेही रा. खानापूर अशा चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली.

त्यांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीत आरोपींना त्यांच्या साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मयुर लहानू मुर्तडक रा. राजूर, नंदु रामा भले रा. दिगंबर, राजूर यांना देखील या गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपींकडून सोयाबीनसह एक पिकअप गाडी असा एकूण १९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी सोयाबीन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून अधिक तपास चालू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe