अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कुंडलिक बापु हराळ (रा. गुंडेगाव ता. नगर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
सोनेवाडी फाटा, आरणगाव बायपास येथे हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकवरील अज्ञात चालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास भानुदास जाधव (रा. गुंडेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व त्यांचे मेहूणे कुंडलिक हराळ हे केडगाव येथील कांदा मार्केट येथे शेतमाल घेऊन येत असतात. सकाळच्यावेळी फिर्यादी टेम्पोमध्ये तर कुंडलिक हराळ त्यांच्या दुचाकीवरून मार्केटकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिली.
या धडकेत जखमी झालेल्या कुंडलिक यांना उपचारासाठी अहमदनगरमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.