अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील गणेश विहार येथे राहणाऱ्या माजी सैनिकाच्या बंद घरावर भर दिवसा दरोडा टाकून अज्ञात चोरट्यांनी ७लाखांची रोकड लंपास केल्याची आज गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
मालदाड रोड गणेश विहार सोसायटीत माजी सैनिक भाड्याने घर घेऊन राहत आहे. त्यांच्या घराpचे काम सुरु असल्याने ते घरात पैसे आणून ठेवत होते.
आज सकाळी ते या बांधकामावर पत्नीसह घर बंद करून गेले होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
आतील सामनातील उचकापाचक करीत सात लाख रुपयांची रोकड चोरी करून पोबारा केला आहे. ते दोघे घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून शहर पोलीस अधिक तपास करीत आहे. दिवसा चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.