7th Pay Commission : मोदी सरकार महागाई भत्ता वाढीबाबत घोषणा करून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना (Central Government) एक चांगली होळी भेट देईल अशी अपेक्षा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी डीए (DA) वाढवण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक १६ मार्च (March) रोजी होऊ शकते. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांचा डीए सध्याच्या 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त 3 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

आधीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने होळीच्या आधी कधीही अधिकृत विधान करायचे होते. तथापि, झीबिझमधील ताज्या अहवालात असे म्हटले आहे की 16 मार्चला म्हणजे होळीपूर्वीच यावर मोठा निर्णय येऊ शकतो.
AICPI निर्देशांक वर्ष 2001 वर आधारित, औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकात, डिसेंबर 2021 साठी निर्देशांकात एक अंकाची घट झाली आहे.
यासह, निर्देशांक 361 अंकांवर गेला आहे. महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांचा निर्देशांक सरासरी 351.33 आहे. तर, या सरासरी निर्देशांकावर आधारित, महागाई भत्ता 34.04% इतका आहे.
परंतु महागाई भत्ता केवळ राउंड फिगरमध्ये मोजला जात असल्याने, जानेवारी २०२२ पासून केंद्र सरकारला एकूण ३४% महागाई भत्ता मिळू शकेल.