Gold Price Update : सोने उतरले चांदी कडाडली ! ‘हे’ आहेत आजचे दर; जाणून घ्या सविस्तर…

Published on -

Gold Price Update : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा (Russia Ukraine War) परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होताना दिसत आहे. पेट्रोल डिझेल सह इतर अनेक वस्तूंच्या किमती मध्ये चढ उतार होताना दिसत आहे.

सोने (Gold) चांदीचा (Silver) दर (Rate) मागील दोन दिवसांपूवी अधिकच वाढल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता सोने स्वस्त होत आहे आणि चांदी महाग होत आहे. त्यामुळे सोने खरेदी दारांच्या खिशाला झळ बसत आहे.

सोन्या-चांदीच्या दरातील अस्थिरता कायम आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे मौल्यवान धातूंमध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. यादरम्यान सोन्याचे दर आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली, तर चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळाली. सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम २०० रुपयांनी घसरला. चांदीच्या दरात किलोमागे 200 रुपयांची वाढ झाली.

आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 53 हजार 750 रुपये होता. गुंतवणूकदार आणि औद्योगिक मागणी कमजोर राहिली. आठवड्याचा शेवटचा दिवस असल्याने नवीन खरेदीदारही दूर राहिले.

जयपूर सराफा समितीने जाहीर केलेल्या किमतींनुसार सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 150 ते 200 रुपयांची घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 53,750 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिला.

हेच सोन्याचे दागिने 50,600 रुपये, 18 कॅरेट सोन्याचे दागिने 42,300 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. सोने 14 कॅरेट प्रति दहा ग्रॅम 34,300 रुपये होते. चांदीच्या दरात किलोमागे 200 रुपयांची वाढ झाली.

आज चांदीचा भाव 71 हजार 600 रुपये किलोवर राहिला. किरकोळ खरेदीची बाजारपेठ किमतीत सातत्याने वाढ झाल्याने ठप्प झाली आहे, तर गुंतवणूकदारही मोठी खरेदी टाळत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe