‘बीड जिल्हा बिहार झालाय’ धनंजय मुंडेंनी घेतला पंकजा मुंडेंचा समाचार

Published on -

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बीड (Beed) जिल्ह्यावरून भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याला बदनाम करू नका असा टोलाही लगावला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू आहे. असे बोलून तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. असा टोला त्यांनी लगावला आहे.

समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेंला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. बीड जिल्हा बिहार झालाय, बीड जिल्ह्याला मागास म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका. अशी परखड टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलत असताना निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवार (Sharad Pawar) दादऊचा माणूस आहेत की काय, अशी शंका उपस्थित केली आहे.

ईडीनं अटक केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारनं नवाब मलिक (Nawab Malik) यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्यावर निलेश राणे यांना प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

त्यानंतर आता धनंजय मुंडेंनी यांना निलेश राणे यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असाता, कोण निलेश राणे? असा मिश्कील सवाल बोलताना उपस्तित केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News