जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती होणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- मुदत संपणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये नगर जिल्ह्यातील संस्थांचा समावेश असल्याने 14 पंचायत समित्यांवर 13 मार्च (आज) तर जिल्हा परिषदेवर 20 मार्चपासून (पुढील रविवार) प्रशासकांची नियुक्ती होणार आहे.

यात जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी आणि पंचायत समित्यांवर संबंधीत गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या 2017 मध्ये निवडून आलेल्या पदाधिकारी आणि सदस्य मंडळाची पहिली सभाही 21 मार्चला झाली होती.

यामुळे येत्या 20 मार्चला या पदाधिकारी आणि सदस्य मंडळाची मुदत 20 मार्चला संपणार आहे. यामुळे या संस्थेवर 21 मार्चपासून प्रशासक काम पाहणार आहेत.

तर पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि सदस्य मंडळाची पहिली सभा ही 14 मार्च 2017 झालेली होती. यामुळे पंचायतीची मुदत ही 13 मार्च म्हणजेच आज संपणार असून त्याठिकाणी गटविकास अधिकारी हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा निर्णय न्यायालयात झाला नसल्याने विधीमंडळात आरक्षणाबाबत नवीन विधेयक मांडण्यात आले. तसेच होऊ घातलेल्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्वपक्षीयांनी घेतला.

ओबीसींच्या राजकीय आरक्षण सुधारणा विधेयकाला राज्यपालांनी स्वाक्षरी करुन मंजुरी दिली आहे. ओबीसी आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढून राज्यातील मुदत संपण्याच्या मार्गावर असणार्‍या जिल्हा परिषदा व आणि पंचायत समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe