पंतप्रधान मोदींसाठी निवडणुका म्हणजे एक उत्सव ! संजय राऊतांचे रोखठोक विधान

Published on -

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर रोखठोक विधान केले आहे. यावेळी त्यांनी मोदींसाठी निवडणुका (Elections) म्हणजे एक उत्सव असल्याचे विधान केले आहे.

संजय राऊत म्हणाले, मोदी निवडणुकांकडे एक उत्सव म्हणून पाहतात व या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. उत्सवात सामील झालेले लोक मग बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे सर्व प्रश्न निवडणुकीपुरते विसरून जातात, असे राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच राऊत यांनी मोदींना आज तरी कुणीच पर्याय नसल्याचे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच उत्तर प्रदेशातील वारे भाजपविरोधी (bjp) वाहत होते.

तरीही भाजपास मतदान झाले. कारण मतदार नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून पाहतो व त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही. असे त्यांनी स्पष्ट मत सांगितले आहे.

यासोबत राऊत यांनी दिल्ली (Delhi) आणि पंजाब (Punjab) सांभाळण्यात फरक असल्याचे सांगत पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसमधील ‘जी २३’ हा जुन्यांचा गट पुन्हा उसळी मारेल. काँग्रेसचे (Congress) चांगले होऊ नये अशी प्रार्थना करणारे लोक काँग्रेसमध्येच आहेत.

काँग्रेस बरखास्तीचा विचार गांधीजींनी १९४७ मध्ये मांडला आहे. तो अमलात आणायची जबाबदारी या ‘जी २३’ वाल्या मंडळींनी घेतलेली दिसते. पंजाब भाजपकडे नव्हते, पण ज्या काँग्रेसकडे ते होते ते त्यांनी गमावले आहे.

देशाच्या सीमावर्ती राज्यात ‘आप’सारख्या पक्षाने बहुमत मिळवणे हा राष्ट्रीय पक्षाचा पराभव आहे. अत्यंत संवेदनशील असे हे राज्य आहे. दिल्लीच्या केंद्रशासित राज्यावर ‘राज्य’ करणे व पंजाबचा सुभा सांभाळणे यात फरक आहे.

दुसरे म्हणजे स्वतः केजरीवाल हे अर्धवट राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे गृह, अर्थ यासारखी खातीच नाहीत. उलट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा मान मोठा असेल.

त्यांच्या हातात स्वतःचे पोलीस दल असेल. त्याचा गैरवापर दिल्लीच्या राजकारणात होऊ नये इतकेच.. असे स्पष्ट मत सांगत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News