मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचा २ तास जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुंबई सायबर पोलिसांचं (Mumbai Cyber Police) पथक २ तास देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करत होते.
डीसीपी हेमराजसिंह राजपूत (DCP Hemraj Singh Rajput) आणि एसीपी नितीन जाधव (ACP Nitin Jadhav) यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. दुपारी १२ वाजता पोलिसांचे पथक फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल झाले होते.
तब्बल दोन तासानंतर पोलिसांचे हे पथक बंगल्याबाहेर पडले आहे. फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ६ वेळा चौकशी साठी नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर आज पोलिसांनी फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर १२ ते २ या वेळात जबाब नोंदून घेतला आहे.
यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले तुम्ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे, असं म्हटलंय. हा गुन्हा सायबर पोलीस ठाणे मुंबई येथे 26 मार्च 2021 रोजी दाखल झाला होता.
अज्ञात इसमानं राज्य गुप्तवार्ता विभागाची माहिती गोपनीय माहिती प्राप्त केली होती. राज्य गुप्तवार्ता विभागाची गोपनीय माहिती बाहेर गेल्यानं हा गुन्हा नोदं करण्यात आला होता. भारतीय टेलिग्राफ कायदा, गोपनियता कायदा याअतंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
त्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला होता, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. आतापर्यंत 24 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा नोटीस बजावण्यात आलं होतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नोटीस म्हणजे समन्स नव्हे, असं देखील वळसे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी कोणती माहिती द्यायची कोणती नाही हा त्यांचा अधिकार आहे. यापूर्वी फडणवीस यांना नोटीस पाठवली होती त्यावेळी त्यांना प्रश्नावली पाठवली होती.
प्रश्नावलीची उत्तर त्यांनी दिली नव्हती. त्यामुळं आज पोलीस त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवून घेत आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.