नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) कार्यकारिणीची बैठक सध्या दिल्ली मध्ये सुरु आहे. उत्तरप्रदेश (UP) सह इत्तर राज्यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याची चर्चा यामध्ये होणार असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्ष पदासाठी (Congress President) राहुल गांधी यांचे नाव घेतले आहे. काँग्रेसच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होणार का याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसचं नेतृत्त्व करायला हवं. तसेच मोदींचा मुकाबला राहुलच करू शकतात. असे मत अशोक गहलोत यांनी मांडले आहे. त्यामुळे गेहलोत राहुल गांधींच्या समर्थनार्थ असल्याचे पाहायला मिळाले आहे.
काँग्रेस पक्षाला एकजूट ठेवण्यासाठी अध्यक्षपदी काँग्रेच्या अध्यक्षपदी गांधी परिवारातीलच व्यक्ती असणं गरजेचं आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष होण्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणं टाळलं असून मी सध्या जेत करतो, तेच माझ्यासाठी चांगलं आहे असे गेहलोत म्हणाले.
अशोक गेहलोत यांनी माध्यमांवरही टीका केली आहे. मीडिया पीएम मोदी आणि अमित शाह यांच्या दबावाखाली काम करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
तर दुसरकडे पंजाबात (Punjab) काँग्रेससह प्रस्थापितांना मात देणाऱ्या आप पक्षाचा काँग्रेसला कोणताही धोका नाही, असंही ते म्हणालेत. मीडिया आपला वाढीव कव्हरेज देत आहे असा आरोप ही त्यांनी केला आहे.