Petrol Diesel Price : देशात इंधन दर स्थिर असताना पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या १ लिटर किती पैसे मोजावे लागतील

Published on -

Petrol Diesel Price Today : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) आजही इंधन दरात कोणताही बदल केले नसल्याचे समजत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड चढउतार झाल्यानंतर गेल्या वर्षी (नोव्हेंबर २०२१) दिवाळीपासून भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये कायम आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९५.४१ रुपये आणि डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटरवर आहे.

तर कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०१.४० रुपये तर, डिझेलची किंमत ९१.४३ रुपये मोजावे लागत आहेत.

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे पेट्रोल – डिझेल वाढणार?

रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ११० डॉलर आहे. तेल कंपन्यांनी ३ नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केलेला नाही.

मात्र कच्चे तेलाची किंमत प्रति बॅरल ३३ डॉलरपेक्षा जास्त महाग झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलचे दर एकत्रितपणे वाढवण्याऐवजी सरकारी तेल कंपन्या दररोज किमतीत किरकोळ वाढ करण्याचा विचार करू शकतात, त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा जास्त तोटा सहन करावा लागणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News