जबरदस्त कमाई ! गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे झाले 61 लाख रुपये

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News :- शेअर बाजारातून चांगली कमाई करण्यासाठी, नफा कमावण्यासाठी संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे.

एक मल्टीबॅगर शेअर आहे, ज्याने गुंतवणुकदारांच्या संयमाला दणदणीत नफ्यात बदलले आहे. अल्काइल अमाइन्स या केमिकल कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे.

हा केमिकल कंपनीचा शेअर 2021 मधील मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहे. 7 मार्च 2014 ला या केमिकल कंपनीच्या शेअरची किंमत 49 रुपये होती.

तर 11 मार्च 2022 ला बाजार बंद होताना कंपनीच्या शेअरची किंमत 3010 रुपयांवर पोचली होती. 8 वर्षांच्या कालावधीत अल्काइल अमाइन्सच्या शेअरच्या किंमतीत जवळपास 61 टक्के वाढ झाली आहे.

अल्काइल अमाइन्सच्या शेअरच्या किंमतीच्या ट्रेंडनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे मूल्य आज 20 लाखा रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 8 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 49 च्या किंमतीला या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे मूल्य जवळपास 61 लाख झाले असते. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 8 वर्षांत 49 रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून 3010 रुपयांपर्यंत वाढला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News