ICICI बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी, FD व्याजदरात बाबत झाला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News :- आयसीआयसीआय बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. ज्या ग्राहकांनी आयसीआयसीआय बँकेत एफडी केली आहे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

नवीन दर 10 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत. दरम्यान देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ने देखील अलीकडेच FD वरील व्याजदरात बदल केले आहेत.

बँकेच्या या निर्णयाचा फायदा त्या ग्राहकांना होईल ज्यांनी 3 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ FD केली आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 4.6 टक्के व्याज मिळेल.

यासाठी 3-10 वर्षे कालावधी आहे. जर कालावधी 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी असेल तर ग्राहकांना 4.50 टक्के व्याज मिळेल.

जाणून घ्या FD व्याज
बँकेने म्हटले आहे की 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर सर्व दर लागू आहेत.
ग्राहकाला 15 महिने किंवा त्याहून अधिक आणि 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 4.2 टक्के व्याज मिळेल.
18 महिने किंवा त्याहून अधिक आणि 2 वर्षांपेक्षा कमी FD वर 4.3 टक्के व्याज असेल.
एक वर्ष ते 15 महिन्यांसाठी FD करणाऱ्या ग्राहकाला 4.15 टक्के व्याज मिळू शकते.
एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर बँक 2.5 टक्क्यांवरून 3.7 टक्के व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe