7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच खात्यात येणार ३८,६९२ रुपये

Ahilyanagarlive24 office
Published:

7th Pay Commission : केंद्र सरकार (Central Government) सरकारी कर्मचाऱ्यांचा १६ मार्चपर्यंत आनंदाची बातमी (Good news) देण्याची शक्यता आहे. यामध्ये महागाई भत्ता (DA) तीन टक्क्यांनी वाढणार असून, त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार असल्याचे समजत आहे.

सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना ३१ टक्के दराने महागाई भत्ता मिळतो, मात्र तो ३४ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे, म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (central employees) पगारात भरघोस वाढ होणार असल्याचे निश्चित आहे.

कधी होणार वाढ?

केंद्र सरकार होळीपूर्वीच महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते. म्हणजेच सरकार १६ मार्च रोजी डीए वाढवण्याची घोषणा करू शकते असे स्पष्ट आहे.

१६ मार्च रोजी होऊ शकते बैठक

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर महागाई भत्ता जाहीर केला जातो. यावेळी १६ मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे.

जुलैमध्ये पुन्हा मोजणी केली जाणार

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ ५० लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. याशिवाय, जुलै २०२२ मध्ये पुन्हा महागाई भत्त्याची मोजणी केली जाईल.

होळीनंतर मिळणार पूर्ण पैसे

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम होळीनंतर दिली जाण्याची शक्यता आहे. होळीनंतर कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचे सर्व पैसे मिळतील.

जर तुमचा मूळ पगार १८,००० ते ५६,९०० रुपयांच्या दरम्यान असेल आणि तुम्ही ३४ टक्के दराने DA काढला तर तुमचा महागाई भत्ता दरमहा १९,३४६ रुपये होईल. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना १७,६३९ रुपये थकबाकी मिळत आहे.

खात्यात ३८,६९२ रुपये येणार येणार

कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये एकूण १७०७ रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर त्याची मोजणी केली तर ते सुमारे २०,४८४ रुपये इतकी आहे. कर्मचाऱ्यांना मार्चमध्ये २ महिन्यांची थकबाकी दिली जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या खात्यात ३८,६९२ रुपये थकबाकी म्हणून येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe