अहमदनगर ब्रेकिंग : बारावीचा गणिताचा पेपर फुटला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- नगर जिल्ह्यात बारावी बोर्डाचा गणित विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास उत्तरासहित प्रश्नपत्रिका यांच्या मोबाईलच्या व्हाट्सअप वर आल्याने एकच खळबळ उडाली.

याबाबत गट शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे.

यासंबंधी माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगितले की, ‘श्रीगोंद्यात हा पेपर सुरू झाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने अशी प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची माहिती मिळाली.

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींकडून यासंबंधी शिक्षण विभागाकडे विचारणा झाल्यावर आम्ही चौकशी सुरू केली आहे. पेपर सुरू झाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे दिसते.

तरीही हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे हे कसे आणि नेमके कोठून घडले, याची चौकशी करण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठवून पुढील कार्यवाहीसंबंधी मार्गदर्शन मिळविण्यात येणार आहे. या दरम्यान, जिल्ह्यातील सर्व केंद्रावर बारावीचा पेपर सुरळीत सुरू आहे,’ असेही कडूस यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe