जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची (Raodsaheb Danve) यांनी नाभिक समाजाविषयी केलेले विधान चांगलेच महागात पडल्याचे समजत आहे. त्यांच्याविरोधात नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
दानवे यांनी राज्य सरकारवर (state government) टीका करताना या सरकारची अवस्था तिरुपती (Tirupati) येथील न्हाव्यांसारखी झाल्याचे सांगत, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे मारून ग्राहकांना (customers) बसवून ठेवतात, तसे आघाडी सरकार करतेय, अशी टीका केली होती.

यामुळे जालनातील (Jalna) नाभिक समाजाने एकत्र येत नाभिक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष कल्याण दळे (Kalyan Dale) यांच्या अध्यक्षतेखाली जालन्यातील मामा चौकात आज आंदोलन करण्यात आले. तसेच दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी जालन्यात दानवे यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जात आहे. तसेच दानवे यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात उग्र आंदोलन उभारु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, जालण्यात एका कार्यक्रमादरम्यान राज्य सरकरवर टीका करताना दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची तुलना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांशी केली होती.
ते म्हणाले होते, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसं आघाडी सरकारचं सुरु आहे. विकासकामांना तुटपुंजा निधी देत महाविकास आघाडी सरकारनं लटकत ठेवलं आहे, असे दानवे म्हणाले होते.