मुंबई : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेनड्राईव्ह (Pendrive) देऊन मोठा बॉम्ब फोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तसेच त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. गृहमंत्री दिली वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांना यावरून टोला देखील लगावला आहे.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विनाकारण दाऊद दाऊद करू नका, फडणवीस हे डिटेक्टिव्ह आहेत का असा टोला लगावला होता.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी एक एबीआय काढला आहे. फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं त्याचं नाव आहे. अरे प्रकरणं बाहेर काढणं हे माझं कामच आहे. मी विरोधी पक्षनेता आहे.
विरोधी पक्षाकडे सोशित पीडित लोक येत असतात. ते अशा गोष्टी आमच्याकडे आणून देतात. अजूनही काही गोष्टी येणार आहेत. त्या गोष्टी मला मांडाव्या लागतात. सोशित ते माझं कामच आहे असे म्हणत फडणवीसांनी वळसे पाटलांना टोला लगावला आहे.
मी सरकारला पेन ड्राईव्ह दिला आहे. त्यातून गिरीश महाजन यांच्याकडे कशी रेड मारायची आणि त्यांना कसं अडकवायचं हे दिसून येतं. हे प्रकरण सीबीआयला द्यायला हवं होतं.
पण त्यांनी दिलं नाही. दिलीप वळसे पाटील हे मातब्बर आणि अनुभवी नेते आहेत. तेही आज बोलताना अडखळत होते. उत्तर चुकीचं देतोय हे त्यांना माहीत होतं.
पण या प्रकरणाची चौकशी सीबीआयला (CBI) देत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. त्यासाठी कोर्टात जाऊ. कोर्टात गेल्यावर आणखी मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होईल असेही फडणवीस म्हणाले आहेत.
वक्फ बोर्डाचे सदस्य मुदस्सीर लांबेंची क्लिप दिली आहे. या सरकारमध्ये ज्या लोकांची दाऊदसोबत जवळीक दाखवली जाते त्यांना प्राधान्य आहे. अशा लोकांची अपॉईंटमेंट होते.
निवडून आले ते सांगत आहे. पण त्याची पद्धत काय आहे पाहू. त्यांचा राष्ट्रवादीशी काय संबंध जगजाहीर आहे. दाऊदशी संबंधित लोकांबाबत त्यांचं विशेष प्रेम दिसतंय, असा टोलाही त्यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.