बच्चे कंपनीची आवडती मॅगी महागली; जाणून घ्या नवे दर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- दोन मिनिटात तयार होणारी मॅगीच्या किंमतीत वाढ झाली आहे. मॅगीसोबतच चहा आणि कॉफीच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

त्यामुळे यापुढे मॅगी, चहा आणि कॉफी घेण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. मॅगीच्या किमती 9 ते 16 टक्के पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. 12 रुपयांचा मॅगीचा पॅक आता 14 रुपयांना मिळणार आहे. तर, 140 ग्रॅमचा पॅक 3 रुपयांनी वाढला आहे. तर, 96 रुपयांचं पॅकेट आता 105 रुपये झालं आहे.

कॉफीच्या किंमती वाढल्या कॉफीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. Bru च्या किंमतीमध्ये तीन ते सात टक्केंनी वाढ झाली आहे. त्याशिवाय ब्रू गोल्ड कॉफीच्या किंमतीत तीन ते चार टक्के वाढ झाली आहे.

चहा किती रुपयांना झाला? इंस्टेन्ट कॉफीच्या पाकिटाची किंमत तीन ते 6.66 टक्क्यांनी वाढली आहे. त्याशिवाय ताजमहल कंपनीच्या चहाची किंमत 3.7 ते 5.8 टक्केंनी वाढली आहे. ब्रूक बॉन्डचा चहाची किंमत 1.5 ते 14 टक्केंनी वाढला आहे.

मॅगी का महागली? नेस्ले इंडियानं मॅगीच्या किमती का वाढवल्या या संदर्भात माहिती दिली आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं मॅगीचा उत्पादन खर्च वाढला आहे. तज्ज्ञांनी रशिया आणि यूक्रेन युद्धामुळं गहू महागला असून त्यामुळं त्याचा देखील परिणाम झाला असू शकतो, असं सांगण्यात आलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर गेल्या 9 वर्षातील सर्वाधिक पातळीवर आहेत. तर मका देखील गेल्या आठ महिन्यातील सर्वादिक दरानं विकली जात आहे. त्यामुळं दरवाढ झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News