आमदारांच्या पीएसह ड्रायव्हरच्या पगारात झाली मोठी वाढ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील आमदारांचा स्थानिक विकास निधी आगामी आर्थिक वर्षात चार कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये करण्याची घोषणा बुधवारी विधानसभेत केली.

तसेच आमदारांच्या ड्रायव्हरला दिले जाणारे वेतन १५ हजार रुपयांवरून २० हजार रुपये तर पीएचे वेतन २५ हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्याची घोषणाही केली.

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना पवार यांनी वरील घोषणा केली. ते म्हणाले की, खासदारांचा निधी पाच कोटी करताना केंद्र सरकारने मागेपुढे पाहिले होते. मात्र, राज्य सरकारने आमदारांच्या निधीत एक कोटी रुपयांची वाढ केली.

राज्यातील आमदारांना मिळणारा आमदार निधी २०१९ मध्ये दोन कोटी रुपये होता. मार्च २०२० मध्ये तो तीन कोटी केला गेला.

मार्च २०२१ मध्ये तो चार कोटी झाला व मार्च २०२२ मध्ये तो चार कोटी रुपयांवरून पाच कोटी इतका केला गेला. दरम्यान विदर्भ व मराठवाड्यावर महाविकास आघाडी सरकारकडून अन्याय सुरू असल्याची टीका विरोधकांनी केली होती.

त्याचा समाचार घेताना पवार म्हणाले की, राज्यपालांच्या निर्देशानुसार विदर्भाला २३.३ टक्के निधी प्राप्त व्हायला हवा. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात विदर्भाला अनुक्रमे २६ टक्के व २६.०४ टक्के निधी दिला गेला. मराठवाड्याला १८.७५ टक्के निधी देण्याचे निर्देश आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News