आरटीई प्रवेशांतर्गत तीन हजार जागांसाठी जळपास सात हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022  Ahmednagar News :- नगर जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत नोंदणीकृत 400 शाळांमधील प्रवेशासाठी 6957 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 3058 जागा उपलब्ध आहे.

दरम्यान बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो.

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार्‍या शाळांची संख्या 400 आहे. तेथील 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी प्रवेशाच्या एकूण जागा 3,058 आहेत.

आरटीई प्रवेशांतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया संपली असून पुढील टप्प्यात शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी एकत्रितपणे राज्यस्तरीय लॉटरीची प्रक्रिया होणार आहे.

आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी दि. 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, अनेक शाळांना आरटीई प्रवेशाच्या नोंदणीसाठीच वेळ लागल्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरण्यासाठी अडचणी आले.

सदर बाब संचालनालयाच्या लक्षात आले. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी दि. 10 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती.

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी महत्वाचे कागदपत्रे
विद्यार्थ्यांचे निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका (रेशनकार्ड),
पालकांचा वाहन चालविण्याचा परवाना,
वीज अथवा दूरध्वनी बिल,
मिळकत कर देयक,
आधारकार्ड, मतदान ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe