अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- धुलिवंदनचे रंग खेळून झाल्यानंतर चौघांनी त्यांच्या मित्राला होळीच्या राखेत टाकले. यात त्याची पाठ मोठ्या प्रमाणात भाजली.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांसह तीन ते चार जणांचा समावेश आहे.
फिर्यादी संजय भाऊसाहेब जाधव (वय ५०, रा. सौरभनगर, भिंगार) यांचा मुलगा रंग खेळत होता. दुपारच्या सुमारास त्या मुलांकडील रंग संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राला उचलून गुरूवारी साजऱ्या केलेल्या होळीच्या राखेत नेऊन टाकले.
होळीच्या राखेत असलेल्या विस्तवाने त्या मुलाची पाठ भाजली. यानंतर त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.