अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Crime :- तरूणावर चाकू हल्ला करत डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. अल्ताफ अल्हाउद्दीन बागवान (वय 25 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) असे जखमी तरूणाचे नाव आहे.
दरम्यान, कोणत्या कारणातून त्याला मारहाण झाली याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याच्यावर अहमदनगर मधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नागापूर येथील सेंट मेरी चर्च येथे ही घटना घडली.
त्याने एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम नरेंद्र भाकरे, कुबड्या ऊर्फ किरण दशरथ पालवे, ढाब्या ऊर्फ नाविण्य भाकरे,
दीपक बेरड, भुर्या (पूर्ण नाव माहिती नाही), आशिष अशोक भाकरे (सर्व रा. नवनागापूर, अहमदनगर) व त्यांचे इतर दोन ते तीन साथीदार यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी बागवान हा तरूण रिक्षा चालवतो. आरोपींनी त्याला फोन करून नागापूर येथील सेंट मेरी चर्च समोर बोलून घेतले. बागवान हा येताच आरोपींनी त्याच्यावर चाकू हल्ला केला.
तसेच बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. जखमी बागवान यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने रूग्णालयात पोलिसांना जबाब दिला. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.