Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर

Published on -

Petrol Price Today: रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) कच्चा तेलाच्या किमती कमी जास्त होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Disel) दरावर (Rate) होत आहे. मात्र युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) कच्च्या तेलाची किंमत कमी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास ३ आठवडे विक्रमी पातळीवर राहिलेल्या रशिया-युक्रेन तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती आता प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आल्या आहेत.

अशा परिस्थितीत भारतीय तेल कंपन्यांसाठीही (Indian oil companies) दिलासादायक बातमी आहे. खरेतर, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने किरकोळ तेल कंपन्यांवरील मार्जिनचा दबाव कमी झाला आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी काही दिवस स्थिर राहू शकतात.

महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर काय आहेत?

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, 20 मार्च 2022 रोजीही, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

त्याचप्रमाणे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 101.40 रुपये आणि डिझेलचा दर 91.43 रुपये प्रति लिटर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News