अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 300 किलो गोमांस जप्त

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर शहरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून 300 किलो गोवंश जनावरांचे मांस व एक मालट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 45 हजार रुपये किमतीचे 300 किलो गोवंश जनावरांचे मांस व 2 लाख रुपये किमतीचा मालट्रक असा एकूण 2 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुरेश बाळू मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तौसीफ ताहीर कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर), गुलाम फरीद कुरेशी (रा. मोगलपुरा, संगमनेर, समोशीद्दीन कुरेशी (रा. संगमनेर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe