चक्क लग्न जुळत नसल्याने दारुडा विजेच्या टॉवरवर चढला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News :- पुण्यातील आळंदी परिसरात एक अजबच प्रकार घडल्याने सध्या मोठी चर्चा रंगली आहे. लग्न जुळत नसल्याने मद्यपी तरुण विजेच्या टॉवरवर चढला होता.

अखेर आळंदी पोलीस, अग्निशमन दलाने त्याला खाली उतरविले आहे. किशोर दगडोबा पैठणे वय- ३० असं या तरुणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी, लहान मुलाचं लग्न जुळलं असून मोठा मुलगा म्हणजेच किशोर मद्यपान करतो, घरी येत नसल्याने त्याचा विवाह जुळत नाही असं त्याच्या आईने पोलिसांना सांगितलं आहे.

किशोर हा मानसिक तणावात आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान शनिवारी रात्री दहाच्या सुमारास किशोरने मद्यपान करून थेट हायटेन्शन टॉवर गाठलं.

काही विचार न करता तो दीडशे फूट उंच टॉवरवर चढून बडबड करायला लागला. याची माहिती आळंदी पोलिसांना स्थानिकांनी दिली.

पोलीस स्टाफ घटनास्थळी पोहचला. मात्र, मद्यपान केलेला किशोर मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान तेथील महावितरण अधिकारी, पोलीस पाटील आणि पोलीस अधिकारी यांनी तेथील हायटेन्शन टॉवरवरील विद्युत प्रवाह बंद केला.

त्या अवस्थेतही त्याचं दारू पिणं सुरूच होतं. दरम्यान, सर्वांनी प्रयत्न करून आणि किशोरची नशा उतरल्यानंतर त्याच मतपरिवर्तन झालं आणि त्याला सकाळी साडेसात वाजता खाली उतरवलं.

दरम्यान, ह्या घटनेमुळे पोलीस यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा आणि स्थानिक पोलीस पाटील यांची झोप उडाली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe