अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Krushi News :- राज्यातील कृषी पंपाचे थकीत बिलावर 50 टक्के माफी देऊन उर्वरीत 50 टक्के वसुल करुन थकबाकीमुक्त करण्याचे धोरण राज्य सरकारकडून आखण्यात आले असून या योजनेस 10 दिवस उरले आहेत.
तर शेतकऱ्याचा या योजनेत सहभाग वाढवण्यासाठी महावितरण प्रयत्न करीत आहे. राज्यातील महावितरण आणि शेतकरी यांच्यात कृषीपंपा चे वीज थकबाकी वरून चांगलाच वाद पेटला आहे.
तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी महावितरणाच्या विरोधात आंदोलन देखील केले आहे. असे असले तरी कृषी धोरण 2020 च्या योजने शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता यावा म्हणून निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत उपविभागातील खेडेगाव,वरखेडा,चिंचखेड,पालखेड , शिरवाडे वणी, कोकणगाव, साकोरा अशा 38 गावांमधून 70 ते 80 महावितरण अधिकारी कर्मचारी यांनी मोटारसायकल रॅली काढून ग्राहकांचे प्रबोधन केले आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्च ही शेवटची डेडलाईन ठरवण्यात आली आहे. तर वसुल झालेल्या रकमेपैकी 66 टक्के ही ‘कृषी आकस्मिक निधीतून’ वीज यंत्रणेतील विकास कामांवर खर्च केला जाणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी 50 टक्के रक्कम भरून त्या रकमेचा वापर हा शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी होणार आहे.