Petrol Price Today : तब्बल १३७ दिवस स्थिर असलेले पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, जाणून घ्या आजचे दर…

Petrol Price Today : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्चा तेलाच्या (Crude oil) किमतींमध्ये चढ उत्तर पाहायला मिळत होता. त्यामुळे पेट्रोल (Petrol) डिझेल (Disel) चे कमी जास्त होत होते. पेट्रोल डिझेलच्या दरात तब्बल १३७ दिवसांनी वाढ झाली आहे.

अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात होती. आजपासून म्हणजेच मंगळवारपासून पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याचे कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती. दरम्यान, रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर तेजच्या किमतीत वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर किती वाढले?

पेट्रोल डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. देशभरात महागड्या किमती लागू झाल्या आहेत. यापुढे दर दिवसेंदिवस वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 137 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

मागील वर्षी 4 नोव्हेंबर 2021 रोजी देशात इंधनाच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. सकाळी 6 वाजल्यापासून नवीन दर लागू झाले आहेत. याचा अर्थ आता कारची टाकी पूर्ण भरणे तुम्हाला महागात पडले आहे.

कोणत्या शहरात पेट्रोलचे दर किती आहेत?

दिल्लीत पेट्रोलचा दर 96.21 रुपये प्रति लिटर आहे
दिल्लीत डिझेलचा दर 87.47 रुपये प्रति लिटर आहे

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 110.82 रुपये आहे
मुंबईत डिझेलचा दर 95 रुपये प्रतिलिटर आहे

कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.51 रुपये आहे
कोलकात्यात डिझेलचा दर 90.62 रुपये प्रति लिटर आहे

चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.16 रुपये प्रति लिटर आहे
चेन्नईमध्ये डिझेलचा दर 92.19 रुपये प्रति लिटर आहे

तेलाच्या किमती दररोज अपडेट केल्या जातात

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. मात्र, नोव्हेंबरपासून भारतातील किमती स्थिर आहेत.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा.