उस्मानाबाद : भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सडकून टीका केली आहे. MIM ने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस ला (Congress) आघाडी समावून घेण्याची ऑफर दिली होती. त्यावरून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे.
हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला (Shivsena) टार्गेट केले जात आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून MIM ला महाविकास आघाडीत घुसवण्याचा प्रयत्न भाजप (BJP) करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
नितेश राणे हे सह कुटुंब तुळजापूरमधील (Tuljapur) भवानी मातेच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे आहे.
नितेश राणे म्हणाले, MIM ने तिघांना लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. आता त्यांनी खुशाल लग्न करावे, हनीमून करावे. त्यांच्या घरात कोण कोणाबरोबर झोपतो, हा प्रश्न आमचा नाही.
त्यांचा परस्परांमधला प्रश्न आहे. भाजप म्हणून आम्ही सरळ स्पष्ट आहोत. 2024 च्या निवडणुकीत भाजप स्वतःच्या ताकदीवर सत्ता आणतंय एवढं सरळ स्पष्ट आहे असे म्हणत खालच्या पातळीवर जात नितेश राणे यांनी टीका केली आहे.
MIM ने महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर शिवसेनेने भगवा झेंडा सोडून हिरवा झेंडाही हाती घेऊ शकते असे म्हणत भाजपकडून बोचरी टीका करण्यात येत आहे.
महाविकास आघाडी नावाचे संकट 29 नोव्हेंबर 2019 पासून महाराष्ट्रावर आलंय ते संकट दूर करण्यासाठी भवानी मातेला साकडं घातलं आहे. संभाजीनगर आणि धाराशिव हे नामकरण करणे उध्दवजींच्या नशिबात नाही ते काम देवेंद्रजी करतील.
बाळासाहेबांची सगळी स्वप्न भाजप यापुढे पूर्ण करेल. बाळासाहेबांनंतर महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस हेच हिंदुहृदयसम्राट आहेत. असेही नितेश राणे म्हणाले आहेत.