ऊस पिकाला डावलून शेतकऱ्यांनी केली ‘या’ पिकाची लागवड; अतिरिक्त ऊस प्रश्न देखील लागणार मार्गी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Krushi News :- सध्या राज्यात अतिरिक्त ऊस प्रश्न चांगलाच पेटला आहे. तर गाळपाचा हंगाम संपून देखील अतिरिक्त उसामुळे कारखाने अजूनही सुरूच आहेत.

अतिरिक्त ऊसाची भविष्यातील अडचण लक्षात घेत. मांजरा नदी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा गतवर्षी पासूनच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला होता.

तर भविष्यातील हाच धोका लक्षात घेत मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी ऊसाला डावलून थेट सोयाबीन पेऱ्यालाच महत्व दिले आहे.

मुबलक पाणी ,पोषक वातावरण आणि सोयाबीनला वाढत असलेले दर यामुळे उन्हाळी सोयाबीनवरच शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

अतिरिक्त उसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अधिकचा पैसा खर्ची करुनही ऊसतोड ही झालेलीच नाही. आता ऊसाला 15 महिने उलटले आहेत. तरी ही ऊस तोड होत नाही.

त्यामुळे यंदाची उसाची स्थिती बघता मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी उसाचे खोडवा पीक घेणे टाळून ते शेत नांगरून त्यामध्ये सोयाबीनचे पीक घेण्याचे ठरवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe