SBI Gold Loan Rate: स्टेट बँक देतीय स्वस्तात गोल्ड लोन पहा सविस्तर माहिती…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 :- SBI Gold Loan Rate: SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना गृह कर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज देते. यासोबतच SBI चे गोल्ड लोन हे गोल्ड लोनसाठी एक आकर्षक पर्याय ठरत आहेत. हि माहिती वाचून , तुम्ही देखील SBI च्या चांगल्या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

SBI गोल्ड लोनचा व्याज दर किती आहे :- SBI ने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना 7.50 टक्के दराने गोल्ड लोन मिळू शकते. याशिवाय, SBI कडून सोने कर्ज घेण्याचे इतर काही फायदे आहेत, ज्या अंतर्गत EMI, ओव्हरड्राफ्ट सेवा आणि परतफेड पर्याय देखील उपलब्ध आहेत.

SBI गोल्ड लोन कसे घ्यावे :- जर तुम्हाला गोल्ड लोन घ्यायचे असेल तर तुम्ही त्यासाठी SBI च्या वेबसाइटवर अर्ज करू शकता. सर्वात आधी हे पाहिलं जाईल की किती कर्ज घेता येईल. कर्ज अर्ज भरा ज्यामध्ये तुम्हाला किमान 20 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

प्रीपेमेंटसाठी SBI चे आकर्षक नियम :- जर तुम्ही SBI चे गोल्ड लोन घेतले आणि ते वेळेआधी फेडायचे असेल तर तुम्हाला त्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही. याशिवाय SBI ने असेही म्हटले आहे की त्यांच्या गोल्ड लोनवर कोणतेही छुपे शुल्क किंवा प्रशासन शुल्क नाही. त्याची प्रोसेसिंग फी देखील कमी आहे, त्यामुळे कर्जासाठीखूप जास्त कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News