मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) आज सकाळीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी निघाले आहेत.
चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिल्यानंतर आज सोमय्या मोठ्या तयारीत भलामोठा हातोडा घेऊन रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत १०० गाड्यांचा ताफा असणार आहे.

सोमय्या यांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी (Ncp) आणि शिवसेनेने (Shivsena) आधीच विरोध केला आहे. या निमित्ताने सोमय्या यांचे शक्तीप्रदर्शन सुरू आहे. त्यामुळेच जोरदार रोड शो करत ताफा घेऊन ते निघाले आहेत.
तसेच आज जर हे रिसॉर्ट पाडलं नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी जोरदार हल्ला केला आहे.
दरम्यान, सोमय्या यांचे चिरंजीव आणि भाजप नगरसेवक नील सोमय्या यांनी या संपूर्ण रोड शोची माहिती दिली. आज सोमय्या यांचा आज दापोलीत मोर्चा सुरू होणार आहे.
अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. सोमय्या यांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आधीच विरोध केला आहे. या निमित्ताने सोमय्या यांचं शक्तीप्रदर्शन सुरू आहे.
मुंबईतुन (Mumbai) थेट खेड आणि खेडहून दापोलीपर्यंत १०० वाहनांचा ताफा त्यांच्या ताफ्यात असणार आहेत. दापोलीत गेल्यावर सोमय्या सुरुवातील पोलीस (Police) ठाण्यावर धडकणार आहेत. त्यानंतर मुरूड येथील साईल रिसॉर्टवर हा मार्च जाणार असल्याचे समजते आहे.