जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड; दोन साक्षीदारांच्या साक्षीत विसंगती, न्यायालयाचे वेधले लक्ष

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar cirme:- येथील जिल्हा न्यायालयात प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर जवखेडे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे.

संजय, जयश्री आणि सुनील जाधव यांच्या हत्याकांडातील आरोपी प्रशांत, दिलीप आणि अशोक जाधव यांनी हत्यारे विहिरीतील पाण्यात धुतल्याचा सरकारी पक्षाचा दावा आहे.

विहिरीत उतरून हत्यारे धुण्याचे प्रात्यक्षिक (डेमो) प्रशांत याने सादर केला होता. या डेमोबाबत न्यायालयात दोघांच्या साक्षी झाल्या आहेत. या साक्षीमध्ये पोलीस अंमलदार महेश पवार आणि तलाठी हरिभाऊ सानप यांच्या साक्षीमध्ये विसंगती असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

पोलीस पथकाने जवखेडे खालसा गावातील राजेंद्र पांडुरंग जाधव याच्या विहिरीत हत्यारे धुण्याचा डेमो करून घेतला होता. या डेमोच्या अनुषंगाने न्यायालयात दोघांच्या साक्षी झाल्या आहेत.

पोलीस अंमलदार महेश पवार यांनी न्यायालयातील साक्षीत सांगितले की, प्रशांतने विहिरीतील दगडी कपारीच्या सहाय्याने पाण्यात उतरला. लाकूड पाण्यात बुचकळून दाखविले.

याच डेमोचे दुसरे पंच असलेले तलाठी हरिभाऊ सानप यांनी साक्षीमध्ये सांगितले की, डेमोपूर्वी विहिरीत दोन-तीन जण अगोदरच पोहत होते.

प्रशांत याने दगडी कपारीच्या सहाय्याने विहिरीत उतरून पाण्याला हात लावून दाखविला. डेमोच्या वेळेस प्रशांतकडे हत्यारे होती की नाही, हे आठवत नाही, अशी साक्ष दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe