अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 AhmednagarLive24 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीरामपुरात सूतगिरणी फाट्यावर दीड लाखाचा हिरा गुटखा जप्त केला. या प्रकरणी तिघांविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोईज मुनिर पठाण, त्याचे वडील मुनिर अब्बास पठाण (दोघे रा. सुतगिरणी, श्रीरामपुर) व शाहरूख मजीदखान पठाण (रा. अशोकनगर ता. श्रीरामपुर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मोईज पठाण व मुनिर पठाण हे दोघे बाप-लेक त्यांच्या घरात गुटख्याची साठवणुक करून विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रणजीत जाधव, रोहीत येमुल, सागर ससाणे,
लक्ष्मण खोकले यांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभाग, अहमदनगर यांच्यासह नमुद ठिकाणी जावुन छापा टाकला. घरामध्ये हिरा कंपनीचा पानमसाला गुटखा तसेच रॉयल 717 नाव असलेले तंबाखुचे पांढर्या रंगाच्या गोण्यामध्ये मिळुण आल्याने पोलिसांनी तो जप्त केला आहे.