उष्णतेची लाट, अहमदनगरमध्ये पारा जाणार ४४ अंशावर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar News :- राज्यात पुढील तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. अहमदनगरमध्येही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.

३० मार्च ते १ एप्रिल या काळात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसं झालं तर २२ वर्षांनंतर मार्च महिन्यातील ते उच्चांकी तापमान ठरणार आहे.

आज अहमदनगरमध्ये कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. उद्या मंगळवारी ते ४३ तर बुधवारपासून तीन दिवस ४४ अंशावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यानंतर तापमानात किंचित घट होणार आहे. सुमारे २२ वर्षांपूर्वी म्हणजे ३१ मार्च २००० रोजी अहमदनगरमध्ये मार्च महिन्यातील उच्चांकी तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदलं गेलं होतं.

त्यानंतर २०१९ मध्ये एकदा मार्चमध्येच पारा ४२ अंशाच्या पुढं गेला होता. इतरवेळी मार्चमध्ये चाळीसच्या आसपासच अहमदनगरचे तापमान राहिल्याचे आढळून येतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe