अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या सरकार सेंद्रिय शेतीला भरपूर प्रोत्साहन देऊन शेतकरी मोठ्या प्रमाणात कसा सेंद्रिय शेतीकडे वळेल या दृष्टीने विचार करत आहे.
गांडुळांचा वापर करून सेंद्रिय खत तयार केले जाते. त्याच खताला गांडूळ खत असे म्हणतात. रासायनिक खतांचा पिकांसाठी वाढत असणारा अतिवापर त्याचा परिणाम जमिनीवर होत असून काही भागातील जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहेत.

रासायनिक खत पिकांना टाकून तयार झालेल्या उत्पादनाचा मानवी शरीरावर देखील दुष्परिणाम होत आहेत. गांडुळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे.
कारण गांडूळ हा शेत जमीन भुसभुशीत करून जमिनीतील उत्पादकता वाढण्यासाठी शेतकऱ्याला मदत करत असतो. तर गांडूळ खताचा वापर हा अलीकडील काळात वाढत असल्यामुळे त्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळे गांडूळ पालनातून पण अधिकचा नफा मिळू शकतो.
गांडुळ शेतीचे फायदे : गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीत फायदेशीर सूक्ष्मजीवांची संख्या वाढते.
गांडुळाच्या खतापासून वनस्पतींना पोषक तत्व सहज उपलब्ध होतात .
त्यामुळे मातीची रचना, हवेचे परिसंचरण आणि पाणी धारण करण्याची क्षमता वाढते
. गांडुळ खताच्या वापराने पिकाची गुणवत्ता आणि चवही वाढते
गांडुळे पाळण्याची पद्धत : त्यासाठी लाकडी डबा बनवावा लागतो.
यासाठी घरातील कोणतेही जुने लाकूडही वापरता येते.
पाण्याचा निचरा होण्यासाठी लाकडी पेटीत काही छिद्रे करा.
मातीतून पाणी वाहून गेले नाही तर डब्यातील गांडुळे मरतात.
गांडुळाला सर्व प्रकारचा सेंद्रिय कचरा जसे की शेण, भाज्यांचे तुकडे,पालापाचोळा इत्यादी खाण्यासाठी देता येतात.
गांडुळ शेती करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी : गांडुळ संगोपनासाठी अंधार असलेली आणि तापमान किंचित उबदार असेल अशी जागा शोधा.
गांडुळे 40 ते 60 अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात.
गांडुळे ओल्या व मऊ ठिकाणी ठेवावीत.
जिथे गांडुळे असतात तिथे सूर्याची किरणे कधीच थेट पडू नयेत.
कारण गांडुळे प्रकाशासाठी संवेदनशील असतात.
गांडुळ शेतीला वाव : गांडुळाचा फायदा शेतकरी गांडूळ खत तयार करून घेऊ शकतात.
गांडुळे थेट शेतात टाकण्यासाठीही शेतकरी त्याची खरेदी करतात.
याशिवाय मच्छीमार गांडुळेही खरेदी करतात.
गांडुळ शेतीमधील खर्च आणि कमाई : बाजारात 300 गांडुळांची किंमत सुमारे 2500 रुपये आहे. जर तुम्ही 4000 चौरस फूट क्षेत्रामध्ये गांडुळाची शेती केली तर त्यातून सुमारे 15,000 गांडुळे वाढतात. जर तुम्ही गांडुळांचे संगोपन करून कंपोस्ट खत तयार केले तर तुम्ही १००x१०० फूट उंचीच्या बेडमधून ५ लाख रुपये कमवू शकता. यासाठी, पहिल्यांदा सेटअप करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 लाखांचा खर्च येऊ शकतो.