या वकिलाने दिला विखेंना कायदेशीर इशारा

Ahmednagarlive24 office
Published:
Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar news:- ‘आपण महाविकास आघाडी सरकारबद्दल जे वर्णन केलं आहे, ते निश्चितच बदनामी करणारं आहे. ते फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या कारवाईत मोडतं,’ असा कायेदशीर इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक वकील अॅड. सुरेश लगड यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिला आहे.

अॅड. सुरेश लगड यांनी महटलं आहे की, ‘आपण समाजात वावरताना पूर्ण विचारांती बोललं पाहिजे. महाविकास आघाडीला नवरा-बायको व वऱ्हाडीची उपमा देऊन अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहात. आपणास हे शोभत नाही.

केवळ सवंग प्रसिद्धीसाठी असे शब्दप्रयोग वापरु नयेत. वडीलकीच्या नात्यानं मी आपणास हे सांगू इच्छितो. त्याचा राग येऊन देऊ नये. आपण वयानं खूप लहान आहात.

आपण काय बोलतो? कुणाबद्दल बोलतो? आपल्या चुकिच्या बोलण्यानं दुसऱ्याच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो? याचं थोडातरी भान ठेवायला हवं. आपण महाविकास आघाडी सरकारचं जे वर्णन केलं ती निश्चितच महाविकास आघाडी सरकारची जाणीवपूर्वक केलेली बदनामी आहे.

आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या तोंडून अशी असंसदीय भाषा शोभत नाही. त्यामुळं केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल महविकास आघाडी सरकारची जाहीर माफी मागावी’, अशी मागणीही अॅड. लगड यांनी केली आहे.