अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :- महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांसाठी आगामी पावसाळा (Rainy season) चांगला राहणार आहे. हे आम्ही नाही तर ऑस्ट्रेलिया हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा (Australian Meteorological Department) अंदाज सार्वजनिक झाला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा (Farmers) आनंद जणूकाही आकाशाला गवसणीच घालू लागला.
ऑस्ट्रेलियन हवामान खात्याच्या मते, मागील वर्षी ज्या पद्धतीने पावसाची हजेरी महाराष्ट्रात बघायला मिळाली होती अगदी तसाच पाऊस यावर्षी देखील येण्याचा अंदाज आहे.
राज्यात येत्या पावसाळ्यात चारही महिने धो-धो पाऊस बरसणार असल्याचे भाकित ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने सांगितले. ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस (Mansoon) एक आनंदाची पर्वणीच ठरेल.
यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होणे शक्य होणार आहे तसेच शेती क्षेत्रावर आधारित असलेल्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील यामुळे बळकट होणार आहे.
ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानुसार जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात राज्यात सर्वसामान्यापेक्षा अधिक पाऊस पडेल. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की ऑस्ट्रेलियात हवामान खाते त्यांच्या अचूक अंदाजासाठी संपूर्ण जगात ओळखले जाते.
यामुळे, या विभागाचा अंदाज नक्कीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले जात आहे. असे असले तरी, अजूनही भारतीय हवामान खात्याचा पावसाचा अंदाज प्रसिद्ध करण्यात आलेला नाही.
आगामी काही दिवसात भारतीय हवामान खात्याचा पावसाचा अंदाज देखील प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा (Indian Meteorological Department) अंदाज काय सांगतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सध्या संपूर्ण राज्यात शेतकरी बांधव पूर्व मशागतीसाठी लगबग करताना बघायला मिळत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव मे महिन्यात खरीप हंगामाची (Kharip Season) पेरणी सुरु करत असतात म्हणून जर या वर्षी ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा अंदाज जर खरा ठरला तर पिकांसाठी एक नवसंजीवनी मिळणार आहे.
यामुळे रब्बी हंगामासाठी (Rabbi Season) आवश्यक पाण्याचा साठा देखील शेतकऱ्यांकडे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेस गती मिळणार आहे. यादरम्यान शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे की, यावर्षी मान्सून हा निश्चितच चांगला असणार आहे.