अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Money News :- खरीप हंगामात अवकाळी पाऊसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे विमा काढले होते.
तर ह्या विम्याची रक्कम आता त्याच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. तसेच त्या संदर्भात राज्य सरकारने विमा कंपन्यांनी त्वरीत शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे सांगितले आहे.

नांदेड जिल्हातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत सुरुवातीला 461 कोटींचा पीकविमा मंजूर झाला होता. त्यातील आता 331 कोटी रुपये पिकविम्यासाठी मंजूर झाले आहेत.
काही दिवसांमध्येच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. याकरिता पुन्हा कोणत्या ही प्रकारची नवीन प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही. विमा कंपन्याकडून पूर्तता होताच निधीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात आले.