मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashatra) कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा क्षण आला आहे. कारण लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मुंबईत (Mumbai) भाषण होणार असून सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
राज ठाकरे यांचे गुढी पाडव्याच्या (Gudi Padva) दिवशी तुफानी भाषण ऐकण्यासाठी दरवर्षी मनसे कार्यकते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र कोरोनच्या (Corona) काळात मनसेची ही सभा होऊ शकली नाही.

त्यामुळे गेली दोन वर्षे मनसे कार्यकर्त्यांसाठी राज ठाकरे यांचा आजच्या दिवशीच्या आवाजाचा विसर पडला आहे. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी वसई विरार मधून शेकडो मनसे सैनिक दादरच्या दिशेने रवाना झाले आहे.
विरार मनवेलपाडा, कारगील नगर, चंदनसार, नालासोपारा पूर्व-पश्चिम, वसई वालीव, गोखीवरे या परिसरातून मनसे कार्यकर्ते दादरमध्ये येत आहेत. काहीजण बस तर काहीजण लोकलने प्रवास करत पोहोचत आहेत.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मुंबई येथे सभेसाठी दाखल होत आहेत. घोटी टोल नाका येथे नवं वर्षाची गुढी नाशिकचे मनसेचे माजी महापौर अशोक मुतडक यांच्या हस्ते उभारण्यात आली आहे.
दरम्यान, शिवतिर्थावरील संपूर्ण वातावरण भगवं झालं आहे. हे आधीच वातावरण बघूनच अनेकांना सभा कशी होणार याचा अंदाज येऊ लागला आहे. तसेच या सभेआधी मनसेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे.