फक्त तूच रे भावा…! एमबीएचे शिक्षण घेऊन शेतीकडे वळला; या पिकाची लागवड केली आणि लखपती झाला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022  Krushi news  :-देशातील नवयुवक शेतकरी (Young farmers) एकीकडे उच्च शिक्षण घेऊन पाच आकडी पगार कमवण्याचे स्वप्न बघतो तर दुसरीकडे असेही काही नवयुवक आहेत जे उच्चशिक्षित असूनही शेतीकडे वळू लागले आहेत आणि शेती क्षेत्रातून चांगला बक्कळ नफा कमवीत आहेत.

अनेक शेतकरी पुत्र शेती तोट्याची असा आव आणत शेती मधून पळ काढत आहेत मात्र असे अनेक नवयुवक आहेत जे शेतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात आणि शेतीमधून चांगले उत्पन्न (Farmers Income) कमवीत आहेत.

आज आपण अशाच एका अवलिया शेतकऱ्याच्या यशोगाथाविषयी जाणून घेणार आहोत. एमबीए झालेला तरुण कसा करू लागला शेती विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या नेर येथील शुभम राजेंद्र नाईक नवयुवक शेतकऱ्यांने एमबीएचे शिक्षण घेऊन शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे.

विशेष म्हणजे या नवयुवकाचे वडील सेवानिवृत्त वरिष्ठ शिक्षक आहेत. शुभम यांचे वडील नोकरी करून त्यांचा उर्वरित वेळ शेती मध्ये घालत होते. वडिलांचे शेती वरील प्रेम शुभम यांनी लहानपणापासून बघितले होते.

तसेच यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी (Farmer Suicide) नेहमी चर्चेत राहिला आहे यामुळे शेतकऱ्यांचे दुःख शुभम यांनी जवळून पाहिले आहे.

यासाठी शुभम यांनी शेतीमध्ये काहीतरी नवीन करावे या उद्देशाने बारावी झाल्यानंतर कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण (Higher education in agriculture) घ्यायचे ठरवले.

यासाठी शुभम यांनी यवतमाळच्या मारोतराव वादाफळे कृषी विद्यापीठातून बीएससी एग्रीकल्चर चे (BSc Agriculture) शिक्षण घेतले.

बीएससी एग्रीकल्चर झाल्यानंतर शुभम यांनी पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथून कृषी क्षेत्रातील एमबीए चे (MBA Agriculture) शिक्षण पूर्ण केले. शुभम यांना एम बी ए नंतर पाच आकडी पगाराची नोकरी सहजच मिळवता येणे शक्य होते.

मात्र पाच आकडी पगार आकडे धावण्यापेक्षा शुभमने समाधान शोधले आणि आपली वडिलोपार्जित सात एकर शेती करू लागला. यामध्ये एक एकर क्षेत्रात अश्वगंधाची लागवड केली.

अश्वगंधा चे बियाणे नागपूर जिल्ह्यातुन त्यांच्या एका कृषी सेवा केंद्र चालक मित्राकडून मागवले. शुभम यांना एक एकर क्षेत्रासाठी पाच किलो बियाणे लागले.

शुभम यांना बियाण्याच्या खर्चसमवेत अश्वगंधा लागवडीसाठी सुमारे पंधरा हजार रुपये खर्च आला. आता शुभम यांना आपल्या एक एकर क्षेत्रातून तीन ते चार क्‍विंटल अश्वगंधा प्राप्त होणार आहे.

यामुळे शुभम यांना उत्पादन खर्चापेक्षा आठ पट अधिक नफा मिळणार आहे. एकंदरीत, गेल्या अनेक वर्षांपासून शेतीक्षेत्रात तोटा सहन करत असलेला यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजा आत्महत्या सारख्या टोकाचा निर्णय घेतो आणि त्याच जिल्ह्यात शुभम सारखा सुशिक्षित तरुण शेतीकडे वळून चांगले उत्पन्न कमवतो हे नक्कीच उल्लेखनीय आहे

आणि भविष्यात यवतमाळ जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव शुभम यांच्याकडून प्रेरणा घेऊन शेतीमध्ये रोजाना नवनवीन कीर्तिमान स्थापन करतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe